Latest
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाहनांच्या ताफ्याला दुचाकीवरून ओव्हरटेक केल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी ३२ वर्षीय शुभम विजय वनित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा आरोप असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे
15-09-2026जळगाव शहरातील तळेले कॉलनी परिसरात २८ वर्षीय महिलेने आपल्या पाच वर्षांच्या मुलासह जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली. महिलेचे पती भारतीय सैन्यदलात राजस्थान येथे कार्यरत असल्याची माहिती आहे. शनिपेठ पोलिसांकडून तपास सुरू आहे.
15-09-2026परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी गणेश साहेबराव भोसले यांनी जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले.
14-09-2026गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या मानाच्या कसबा गणपतीची चार हुतात्मा पुतळा येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली. महापूजेनंतर ढोल-ताशांच्या गजरात श्रींच्या मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ झाला.
14-09-2026मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उळे येथे मराठा समाजाच्या वतीने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरक्षणाचा तातडीने निर्णय घेण्याची मागणी आंदोलकांनी केली.
11-09-2026सोलापूर शहरातील विविध भागांत मध्यरात्रीनंतर होणाऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने चार हुतात्मा पुतळ्याजवळ ‘थाळीनाद’ आंदोलन करण्यात आले. पाणीपुरवठ्याची वेळ बदलून दिवसा पाणी देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
10-09-2026
